सलीम मर्चंट, अभिजीत भट्टाचार्य यांच्यासह दिग्गजांनी घेतले अंतिम दर्शन - Salim Merchant
मुंबई - प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुनथ उर्फ केके यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वर्सोवा येथील पार्थ प्लाझा येथील घरी ठेवण्यात आले आहे. यावेळी सलीम मर्चंट, अभिजीत भट्टाचार्य, अशोक पंडीत यांच्यासह दिग्गजांनी अंतिम दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. केके हे खूप मोठे कलाकार होते. त्यांचे लोकांसोबत खूप चांगले संबंध, जवळचे नाते होते. अजूनही विश्वास होत नाही आहे की, ते आपल्यात नाही आहेत. हे इंड्रस्टी खूप मोठे नुकसान आहे, असे अशोक पंडीत यांनी सांगितले.
Last Updated : Jun 2, 2022, 2:35 PM IST