Lal Mahal Lavani Controversy : लाल महालातील लावणी प्रकरणावर वैष्णवी पाटील हिने मागितली जाहीर माफी - लाल महालात लावणी करणाऱ्या वैष्णवी पाटील
पुणे : पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य ( Lal Mahal Lavani case ) करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन ( Faraskhana Police Station Pune ) येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Registered against Vaishnavi Patil ) आहे. दरम्यान आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर ज्या ठिकाणी शूट झाले त्या ठिकाणाचे शुद्धीकरण केले आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येऊन मानसी पाटील हिने झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रातील शिवप्रेमींसह सर्वांची माफी मागीतली ( Vaishnavi Patil seeks public apology ) आहे. तसेच तिने हा प्रकार आपल्या कडून चुकीने झाल्या असल्याचेही सांगितले आहे. यापुढे असा कोणताही प्रकार आपल्याकडून होणार नाही याची गाव्हीही तिने व्हिडिओत दिली आहे.