Stunt Viral Video : 'बन रहा था शक्तिमान, कुछ दिनों तक नहीं हो पाएंगे विराजमान'; गाडीवर स्टंट करणे पडले महागात - Stunt Viral Video
लखनऊ (उत्तर प्रदेश) : यूपी पोलीस अधिकारी श्वेता श्रीवास्तव यांनी 17 जुलै रोजी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये प्रथम एक व्यक्ती चालत्या वाहनावर स्टंट टाकताना दिसत आहे. त्यांनतर तो काही क्षणातच खाली कचऱ्याच्या गाडीत पडला. यानंतर तरुण जखमी झाला. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी असे जीवघेणे स्टंट अजिबात करू नका असा सल्ला दिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'बन रहा था शक्तिमान, कुछ दिनों तक नहीं हो पाएंगे विराजमान'. पोलीस अधिकारी श्वेता श्रीवास्तव यांनी केलेल्या ट्विटनुसार ही घटना शनिवारी रात्री घडली. ( stunt on moving vehicle)