महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : मध्यप्रदेशात लग्नानंतर वडिलांनी मुलीची केली हेलिकॉप्टरमधून पाठवणी.. - लग्नानंतर मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले

By

Published : Apr 29, 2022, 3:32 PM IST

सतना ( मध्यप्रदेश ) : सतना जिल्ह्यात एक अनोखा विवाह पार (Unique wedding in Maihar) पडला. येथे मैहर गावात वधुपित्याने लाडक्या मुलीची हेलिकॉप्टरने पाठवणी (Brides farewell by helicopter) केली. नववधू हेलिकॉप्टरने पतीच्या सासरच्या घरी रवाना झाली. हेलिकॉप्टरने होणाऱ्या पाठवणीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. जयपूरहून पाठवणीसाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आले. सतना जिल्ह्यातील सतना रोड, मैहर बेलद्रा गावातील रहिवासी अजय सिंह यांची लाडकी मुलगी आयुषी सिंह हिचा विवाह नेव्ही लेफ्टनंट कमांडर अरविंद सिंग यांच्याशी २७ एप्रिल रोजी झाला. अरविंद हा रेवा येथील इंद्र नगर येथील निवृत्त सुभेदार अर्जुन सिंग यांचा मुलगा आहे. आयुषी अभियंता असून एम.टेक केल्यानंतर इंदूरमध्ये कार्यरत आहे. आयुषी-अरविंदच्या लग्नाचे सर्व विधी मैहरमधील सतना रोडवरील अजय सिंह यांच्या बेलड्रा हाऊसमधून पार पडले. 27 एप्रिलला वरात आली आणि 28 एप्रिलला पाठवणी करण्यात आली. वधूच्या पाठवणीसाठी तिच्या वडिलांनी हेलिकॉप्टर बुक केले होते. जयपूरहून अरिहंत कंपनीचे हे हेलिकॉप्टर २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मैहर येथे पोहोचले. मैहरमध्ये लग्नस्थळाशेजारी हेलिपॅड बांधण्यात आले होते. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे आणि तिचा निरोपही अभिमानाने व्हावा, अशी अजय सिंगची इच्छा होती. अजय सिंगने आपल्या प्रिय आयुषीचे लग्न नौदलाच्या लेफ्टनंट कमांडरसोबत निश्चित केले आणि पाठवणीसाठी हेलिकॉप्टर बुक केले. त्यांच्या घरच्यांचा हा पहिलाच विवाह होता. त्यामुळे तो पूर्ण धूमधडाक्यात पार पडला. निरोपाच्या वेळी वधू-वर हेलिकॉप्टरने मैहरहून रेवा येथे पोहोचले. हेलिकॉप्टर सैनिक शाळेजवळील हेलिपॅडवर उतरले, तेथून नवविवाहित जोडपे कारने इंद्र नगर येथील त्यांच्या घरी गेले.

ABOUT THE AUTHOR

...view details