Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या गटात फूट..? आमदाराने दिल्या 'उद्धव ठाकरे जिंदाबाद'च्या घोषणा - CM Uddhav Thackeray
सुरत ( गुजरात ) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत ( CM Uddhav Thackeray ) पंगा घेत काही आमदारांना घेऊन गेलेल्या मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्या गटामध्ये फूट तर पडली नाही ना? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आज भल्या पहाटे गुजरातमधील सुरतमधून आसामच्या गुवाहाटीला ( Shivsena Rebel MLA Moved To Guwahati ) हलवले. सर्व आमदारांना सुरतच्या विमानतळावरून ( Surat Airport ) गुवाहाटीला पाठविण्यात आले. हे सर्व आमदार गुजरातहून आसामला रवाना होत असताना ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुम्ही शिवसेना सोडणार का?, तुमची भूमिका काय आहे याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव ( MLA Yamini Jadhav ) यांनी 'शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद', अशा घोषणा दिल्या. त्या घोषणा देत असतानाच त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना धक्का देत पुढे नेले. त्यामुळे या आमदारांना बळजबरीने तर आणण्यात आले नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे. यामिनी जाधव या शिवसेनेचे मुंबईतील माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. यशवंत जाधव यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी या आमदारांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे शिंदेंच्या गोटात असलेल्या आमदाराने उद्धव ठाकरे जिंदाबाद घोषणा दिल्याने एकनाथ शिंदेंच्या गोटातही सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसून येत ( MLA Chanted Uddhav Thackeray Zindabad ) आहे.