महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Uday Lalit Indias 49th Chief Justice : भारताच्या सरन्यायाधीशपदी उदय लळित यांची निवड; अ‍ॅड. धनंजय मानेंकडून आठवणींना उजाळा - Uday Lalit

By

Published : Aug 5, 2022, 12:50 PM IST

सोलापूर - भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपूत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले आहेत ( Uday Lalit became Indias 49th Chief Justice ) .ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने ( Senior lawyer Dhananjaya Mane ) यांनी त्यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, माझ्या आजोबांपासून लळित कुटुंबाचा माने कुटुंबाशी संबंध होता. लळित यांनी वकिली क्षेत्रात नाव कमाविले होते. सोलापूर शहरात मोठा मानसन्मान होता. उदय लळीत यांनी १९६९ - ७० व १९७० - १९७१ साली हरिभाई देवकरण प्रशालेत 8 वी व 9वीचे शिक्षण घेतले होते. त्यांच्यासोबत माझ्या मोठ्या बंधूची घट्ट मैत्री होती, असे ऍड धनंजय माने यांनी बोलताना माहिती दिली. लळित यांचे कुटुंबीय लकी चौक ते हुतात्मा चौक मार्गावर वास्तव्यास होते. उदय लळीत ( Uday Lalit ) यांची भारताच्या सर न्यायाधीश पदी निवड झाल्याने सोलापूरकरांचा अभिमान आणि स्वाभिमान वाढला असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी दिली. त्यांच्या वहिनी सविता लळित जनता बँकेच्या चेअरमन होत्या. आता त्या सिविल हॉस्पिटलच्या मागील बाजूस समर्थनगर येथे वास्तव्यास आहेत. आज देखील सरन्यायाधीश उदय लळीत यांचे अनेक नातेवाईक सोलापुरात वास्तव्य करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details