महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nashik Leopard Rescue Video : नाशिकमध्ये बिबट्याचा दाेन बछड्यांचा मृत्यू, तिसऱ्याला मिळाले जीवदान - Two leopard cubs die in Nashik

By

Published : Apr 30, 2022, 1:13 PM IST

नाशिक - नाशिक तालुक्यातील मनाेली येथे बिबट्याच्या दाेन बछड्यांचा मृत्यू ( Two leopard cubs die in Nashik ) झाल्याचे शुक्रवारी समाेर आले. तर, इगतपुरीतील माैजे टाकेद बु. येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनखात्याला यश ( Nashik Leopard Rescue ) आले. देविदास दत्तात्रय गुळवे (रा. मनोली, जि. नाशिक) यांंच्या शेतामध्ये बिबट्याचे 4 ते 5 महिन्यांचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. परिसरातील दुसऱ्या मोठ्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज वनपरिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे यांनी व्यक्त केला असून वनखाते पुढील तपास करत आहेत. तसेच इगतपुरी वनक्षेत्रातील मौजे टाकेद बु. येथे एका विहिरीत शुक्रवारी बिबट्या पडला हाेता. याबाबत माहिती कळताच वनपरिक्षेत्र आधिकारी केतन बिरारीस व पथक घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी रात्री 8 वाजता घडलेल्या ह्या घटनेने विहिरीजवळ लोकांची मोठी गर्दी झाली होती. विहिरीत पाणी असल्याने जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड सुरू होती. बिबट्याला विहरीतून बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. विहिरीत जास्त खोल असल्याने बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला मोठी कसरत करावी लागली. यावेळी वनखात्याने पिंजऱ्याच्या मदतीने एक वर्षांचा बिबट्या विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details