Elephants Got Stuck In The Water: ओडिसामध्ये पाणवठे ओलांडण्याचा प्रयत्न करताना दोन हत्ती पाण्यात अडकले - ओडिसामध्ये पाणवठे ओलांडताना हत्ती अडकले
ओडीसा (भोगीपूर) - ओडिसामधील बांकी वन परिक्षेत्रातील भागीपूरजवळ पाणवठे ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना महानदीत दोन हत्ती अडकले. आठगड सुकासेन जंगलातून चांडका-दमपाडा अभयारण्यात परतण्यासाठी नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात ते अडकले. स्थानिकांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वन्य प्राण्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.