नव्या वर्षात राणादा,अंजलीबाईंचा नव्या वास्तुत प्रवेश, वसगडे ऐवजी केर्लीत होतंय शूटींग - Hardik Joshi latest news
तुझ्यात जीव रंगला या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. दिवसेंदिवस या मालिकेच्या प्रेक्षक वर्गात वाढ होताना नेहमी दिसून आलंय. राणादा आणि अंजलीबाई यांचा सुरेख प्रवास नेहमीच टप्प्याटप्प्याने रंजक वळणावर येताना आपण सर्वांनी पाहिला. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापुरातील वसगडे या छोट्याशा गावात या मालिकेचे चित्रीकरण होत आहे. मालिकेने आता चौथ्या वर्षात पदार्पण केलंय, याच नवीन वर्षाच्या स्वागताला मालिकेच्या चित्रीकरणाचे ठिकाण सुद्धा आता बदललंय. कोल्हापुरातल्या केर्ली गावात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या एका नवीन बंगल्यात राणादा आणि अंजलीबाईंचे शिफ्टिंग झालंय.. त्यामुळे अंजली आणि राणादा सोबतच संपूर्ण कुटुंबाचा ज्या वाड्यात जीव गुंतला होता त्या वाड्याला मिस करत आहेत. यासंदर्भातच तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या संपूर्ण परिवारासोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी....