महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO नक्षलवाद्यांच्या गडात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच फडकला तिरंगा

By

Published : Aug 15, 2022, 7:25 PM IST

Updated : Aug 15, 2022, 8:13 PM IST

छत्तीसगडमधील बस्तरच्या चांदमेटा Chandameta of Basta गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवण्यात Tricolor hoisted first time after independence आला. चांदमेटा गावात ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. नक्षलवाद्यांच्या गडामध्ये पहिल्यांदाच तिरंगा Bastar naxalgarh Tiranga अभिमानाने फडकवण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ईटीव्हीने चांदमेटा गावात पोहोचून लोकांशी संवाद साधला. बस्तरमधील छत्तीसगड ओडिशा सीमेवरील चांदमेटा गावात तिरंगा फडकवण्यात आला आहे. चंदमेटा गाव हे ओडिशा आणि बस्तरच्या सीमावर्ती भागात आहे. येथे गावातील लोकांनी सुरक्षा दलांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा पवित्र सण साजरा केला. यावेळी लोकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी या गावात नक्षलवादी काळे झेंडे फडकवत असत. मात्र आता याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जातो ही अतिशय अभिमानाची बाब आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की पूर्वी येथे पोहोचण्यास आठवडा लागत असे. हळुहळू पोलीस येथे पोहोचले असून गावकऱ्यांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला आहे. त्यामुळेच आता गावकरी पोलिसांत सामील होऊन पुढे येत Independence Day celebration in Bastar आहेत.
Last Updated : Aug 15, 2022, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details