VIDEO : परभणीत महामानवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानवंदना - परभणी बस स्थानक
परभणी - येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 131 व्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली. स्वयंसेवकांनी बस स्थानकाजवळील संघ कार्यालयापासून सुरू केलेले पथसंचलन रेल्वे स्टेशनमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा मारून पूर्ण केले. गेल्या काही वर्षांपासून संघाच्या वतीने अशा अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात येते. यावेळी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच अनुयायांची रीघ लागली आहे.