VIDEO: मंत्र्याला रस्ता मोकळा करून देताना पोलिसाने वाहनधारकावर उचलला हात - जितेंद्र आव्हाड ट्राफिक कोल्हापूर
कोल्हापूर - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Police slap man kolhapur news ) यांना रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने चक्क वाहनधारकावर हात उचलला. कोल्हापूरच्या भाऊसिंगजी रोडवर हा प्रकार घडला. आव्हाड ( Police slap man in kolhapur for jitendra awhad vehicle ) हे अंबाबाई दर्शनासाठी आले होते. यावेळी ते ट्राफिकमध्ये अडकले, त्यामुळे त्यांना रस्ता मोकळा करून देताना पोलिसांना चांगलाच घाम फुटला. त्यामुळे, संतप्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट एका वाहनधारकावर हात उचलला.