महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बांधवगढ राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी अनुभवले वाघ-वाघिणींचे थरारक दृश्य - bandhavgarh tiger reserve latest news

By

Published : Apr 17, 2021, 3:32 PM IST

मध्य प्रदेशातील बांधवगढ व्याघ्र राष्ट्रीय उद्यानात काल (शुक्रवारी) पर्यटकांना वाघांचा एक नयनरम्य देखावा पाहायला मिळाला. उद्यानातील छोटा भीम नावाचा वाघ आणि तारा नावाच्या वाघिणीचे पर्यटकांना दर्शन झाले. छोटा भीमने ताराची नजरानजर झाली. त्यानंतर छोटा भीमने ताराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला मात्र, नाराज तारा वाघीणीने छोटा भीमला हुसकावून लावले. त्यामुळे निराश झालेला छोटा भीम वाघ तिथून निघून गेला. तिथे उपस्थित पर्यटकांनी हे सगळे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details