महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mahendra pickup crashed : काळजाचा ठोका उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Viral video

By

Published : Jun 18, 2022, 12:44 PM IST

खोल दरीत महेंद्र पिकअप कोसळताना ( Mahendra pickup crashed deep ravine) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ह्या व्हिडीओची सत्यता तपासली असता व्हिडीओ कन्नड घाटातील ( Kannada Ghat Accident ) असल्याची माहिती मिळाली आहे. दहा दिवसापूर्वी याच महिंद्रा पिकअप गाडीचे कन्नड घाटात मेणबत्ती पॉईंट जवळ ब्रेक फेल ( Pickup break fails in Kannada Ghat ) झाले होते. चालकाने प्रसंगावधान दाखवत पिकअप गाडीमधून उडी घेतली. पिकअप दरीत कोसळत असताना बस मधील काही लोकांनी या घटनेचे चित्रीकरण केले आहे. गेल्या दोन दिवसापासून पिकअप दरीत कोसळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात वाहतूक पोलिसांना ( Traffic police ) विचारले असता ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details