Thieves Stole 4.5 Lakh : मेडिकलचे शटर वाकवून चोरट्यांनी साडेचार लाख चोरले - चोरट्यांनी साडेचार लाख चोरले
नागपूर - मेडिकल स्टोअर्सचे शटर वाकवून चोरट्यांनी साडेचार लाख रुपये चोरल्याची ( Thieves stole 4.5 lakh ) घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या सीए मार्गावरील प्रसिद्ध मेयो रुग्णालयजवळ असलेल्या श्याम मेडिकल स्टोअर्समध्ये ( Shyam Medical Stores ) चोरी झाली. पाच जुलैला पहाटेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाख रुपये चोरून नेले. तिघेही चोरटे पहाटेच्या सुमारास दुकानाचा शटर वाकवून आत मध्ये शिरले आणि दुकानात ठेवलेले साडेचार लाख रुपये घेऊन पसार झाले. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत ( Incident captured In CCTV ) झाली आहे.