Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकीची चोरी करताना चोर सीसीटीव्हीत कैद - Nashik Bike Theft
नाशिक - नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील रॉयल लॉन्स येथून रात्री साडेदहाच्या सुमारास मोटरसायकल चोरीची घटना घडलीय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रविवारी मुंबई नाका परिसरात हॉटेल रॉयल लॉसमध्ये विवाह होता. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी गाडी लॉन्सच्या पार्किंगमध्ये पार्क करून लग्न लावण्यासाठी गेले. तेव्हा चोरट्याने पाळत ठेवून मोटर सायकल चोरून नेली. ही लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने उघडकीस आली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. वाढत्या चोरीच्या घटना, खून घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी आता दिवस-रात्र गस्त वाढवून या घटना कमी कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत ( Thief Theft Bike In Nashik ) आहे
TAGGED:
Nashik Bike Theft