टिंबर ट्रेल रोपवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रॉली अडकली; बचावकार्य सुरू - टिंबर ट्रेल रोपवेमध्ये तांत्रिक बिघाड झाला
सोलन - हिमाचल प्रदेशातील सोलन येथे असलेल्या टिंबर ट्रेल रोपवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक ट्रॉली मध्येच अडकली. या ट्रॉलीमध्ये 11 जण होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. पर्यटकांना ट्रॉलीतून बाहेर काढण्यासाठी दुसरी केबल कार वापरली जात आहे. 4 ते 5 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, काही पर्यटक अजूनही ट्रॉलीमध्येच आहेत. या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रोपवेच्या तांत्रिक तज्ज्ञांसह हिमाचल पोलिसांचे कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. सोलनच्या कलेक्टरनी दिलेल्या माहितीनुसार, या बचाव मोहिमेत एनडीआरएफ आणि हवाई दलाचीही मदत घेतली जाणार आहे. एनडीआरएफची टीम अंबाला येथून आणि एअरफोर्सची टीम कसौली एअरफोर्स स्टेशनवरून घटनास्थळी पोहोचेल. याशिवाय हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूरही टिंबर ट्रेलसाठी रवाना झाले आहेत. यापूर्वी 1992 मध्ये देखील या रोपवेमध्ये अपघात झाला होता. त्यावेळी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
Last Updated : Jun 20, 2022, 4:42 PM IST