Tractor Plunged into Water : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; खारी नदीत ट्रॅक्टर गेला वाहून, पाहा Video - Tractor Plunged into Water
गुजरात - अनेक दिवसांपासून गुजरातमध्ये पावसाने थैमान ( Heavy Rain In Gujrat ) घातले आहे. त्यामुळे साबरकांठा जिल्ह्याला लागून असलेल्या गांधीनगर जिल्ह्यातील धनिओल गावातील खारी नदीत ट्रॅक्टर वाहून ( Tractor Plunged into Water ) गेला. कळवा गावाजवळील विस्तार तळोद येथे मुसळधार पावसामुळे खारी नदीत अचानक पाणी आले. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टर बाहेर न आल्याने ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर सोडून पळ काढला. काही वेळातच नदीत पाणी आले आणि संपूर्ण ट्रॅक्टर पाण्यात बुडाला.