महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

3 Injured In Road Accident Thane : भरधाव टेम्पो तीन जणांना चिरडले, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद - शहाड रेल्वे स्थानक उल्हासनगर

By

Published : Apr 16, 2022, 4:53 PM IST

ठाणे : भरधाव टेम्पोने दुचाकीवरून समोरून येणाऱ्या ( Speeding Tempo Hits The Bike ) दोघांसह एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली ( 3 Injured In Road Accident Thane ) आहे. ही घटना उल्हासनगर शहाड रेल्वे स्थानकाजवळ ( Shahad Railway Station Ulhasnagar ) असलेल्या चौकात घडली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ( Ulhasnagar Police Station ) टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. शहाड भागात राहणारे राहणारे ललितकुमार सिंग हे पत्नीसह उल्हासनगर मधील गजानन मार्केटमध्ये खरेदी करून १४ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास कॅम्प १ च्या सी ब्लॉक रोडवरून दुचाकीहुन घरी निघाले होते. याचवेळी एका भरधाव वेगातील टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्यातून दुचाकीवरून जाणाऱ्या ललित कुमार सिंग त्यांची पत्नी आणि दोन वाटसरून धडक दिली. खळबळजनक बाब म्हणजे अपघाताच्या ठिकाणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्ताने ( Ambedkar Jayanti 2022 ) मिरवणूक जात होती. सुदैवाने मिरवणूक अपघाताच्या ठिकाणी येण्याच्या काही क्षणापुर्वीच भरधाव टेम्पो चालकाने दुचाकीवरील ललित यांच्या पत्नीला फरफटत नेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघात टेम्पो चालकासह तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details