मुलाला साप चावला अन् सापाचाच झाला मृत्यू - साप चावला अन् सापाचाच मृत्यू झाला
गोपालगंज (बिहार) - साधारणत: साप चावल्यानंतर समोरचा व्यक्ती बेशुद्ध होतो नाहीतर दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो. मात्र, काही घटना या आश्यर्यचकीत असतात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. योथील कुचायकोट परिसरातील गावात अंगणात खेळणाऱ्या एका मुलाला साप चावल्याची घटना समोर आली. त्यानंतर त्या मुलाला रुग्णालयातही दाखल करण्यात आले. दरम्यान, ज्या सापाने चावा घेतला त्या सापाचा मृत्यू झाला आहे. मुलावर उपचार सुरू आहेत.