महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Agnipath Protests in Telangana : तेलंगणात अग्निपथ विरोधी आंदोलन चिघळले, रेल्वे पेटवली, गोळीबारात एकाचा मृत्यू - गोळीबारात अग्निपथ आंदोलकाचा मृत्यू

By

Published : Jun 17, 2022, 12:57 PM IST

हैदराबाद - तेलंगणातही आंदोलनाच्या घटना समोर आल्या ( Agnipath Protests in Telangana ) आहेत. आंदोलकांनी येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची तोडफोड केली. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जमलेल्या तरुणांनी एनडीए सरकारच्या विरोधात निदर्शने ( agnipath protest in secunderabad ) केली. जुन्या धर्तीवर भरती करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी हैदराबाद ते कोलकाता जाणाऱ्या ईस्ट कोस्ट ट्रेनला आग लावली. हिंसक आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापरही केला. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. आठ जणांना गोळ्या लागल्या आहेत. निर्मल असे मृताचे नाव सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details