Video : अन् वर्गातच कपडे काढून ढाराढूर झोपला शिक्षक, व्हिडीओ झाला व्हायरल - Teacher sleeping in classroom
उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगरच्या डुमरियागंज तहसील परिसरात असलेल्या सागर रौजा या प्राथमिक शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तेथील शिक्षक वर्गात कपडे काढून ढाराढूर झोपलेला दिसत आहेत. मुलं वह्या आणि पुस्तक घेऊन वाचायला बसली आहेत, पण या शिक्षकाने वर्गाच्या खोलीलाच बेडरूम बनवले. व्हायरल झालेला व्हिडिओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ईटीव्ही भारत या व्हिडिओला दुजोरा देत नाही. ( Teacher sleeping in classroom ) ( primary school in Siddharthnagar ) ( primary school sagar rauja )