लॉकडाऊनमुळे ट्रॅक्सी चालक संकटात, सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी - राज्यात लॉकडाऊन मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चौदा एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्याची घोषणा केली. येणारे पुढील 15 दिवस राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले असून, या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे टॅक्सी चालकांना कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही.