Landslide in Pithoragarh भूस्खलनात टेकडीचा मोठा भाग कोसळला पहा व्हिडिओ - नॅशनल हायवे बंद
तवाघाट लिपुलेख राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारी संध्याकाळी उशिरा नाजंग तांबा गावाजवळ बंद करण्यात आला. येथे एका टेकडीचा मोठा भाग कोसळल्याने ( ladslide in Najang Tamba village ) राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता. नजंग तांबा गावातून जाणारा आदि कैलास मानसरोवर यात्रा मार्ग बंद झाल्याने स्थानिकांसह ४० प्रवासी अडकले आहेत. नजंग तांबा गावाजवळ डोंगर कोसळला त्यावेळी तेथे अनेक प्रवासी उपस्थित होते. त्यांच्यासमोर महामार्गावर डोंगर कोसळला. सुदैवाची बाब म्हणजे या भूस्खलनात कोणतीही जीवितहानी झाली नाही.