महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : चालत्या ट्रकचे चाक अचानक निखळले.. रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला दिली जोराची धडक, जागीच मृत्यू - तमिलनाडु समाचार

By

Published : Jun 8, 2022, 10:52 AM IST

कांचीपुरम ( तामिळनाडू ) : तामिळनाडूतील कांचीपुरम येथे चालत्या ट्रकचा टायर निघून जोरात पुढे जात एका व्यक्तीला धडकला. या घटनेत एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ( man died hit by detached lorry tyre ) झाला. ही वेदनादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रत्यक्षात, एका चालत्या ट्रकचा टायर अचानकपणे निघाला. आणि भरधाव वेगात जात रस्त्यावर उभ्या असलेल्या 45 वर्षीय मुरलीला टायरची धडक बसली. अपघातात जखमी झालेल्या मुरलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 1 मे ची असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. मुरली हा ऑटोचालक होता. घटनेच्या दिवशी तो किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडला. स्थानिक दुकानातून किराणा सामान खरेदी करून घरी जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details