VIDEO : जालन्यात ऊस तोडणीच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे 'मुंडन आंदोलन' - जालना ऊस तोडणी मागणीसाठी मुंडन
जालना - जिल्ह्यात तोडणी आभावी सात ते आठ लाख टन ऊस अजूनही उभाच आहे. उभ्या असलेल्या ऊसाला एकरी एक लाखाचे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखानदार प्रशासन आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला ऊस तोड देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आंदोलकानी केली. शिवाय कारखानदारालाही इशारा देण्यात आला.