VIDEO : राजकारणात फटकेबाजी करणाऱ्या सुप्रिया सुळे क्रिकेटच्या मैदानात बोल्ड - सुप्रिया सुळे यांची क्रिकेट मैदानात फटकेबाजी
मुंबई - वाढत्या महागाईच्या विरोधात रोजच विरोधी पक्षाकडून आंदोलन केली जातात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'महागाई चषक'चे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात क्रिकेट सामने राष्ट्रवादी काँग्रेस कडून आयोजित करण्यात आले आहेत. या सामन्यांना "महागाई चषक" असं नाव देण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. मात्र, फलंदाजीत फटकेबाजी करत असतानाच सुप्रिया सुळे क्लीन बोल्ड झाल्या.