महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Eknath Shinde as the CM : नांदेडमध्ये बंडखोर आमदार कल्याणकर यांच्या घरासमोर समर्थकांचा जल्लोष - Eknath Shinde as the CM

By

Published : Jul 1, 2022, 2:05 PM IST

एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यामंत्रिपदी ( Eknath Shinde as the CM ) शपथ घेतल्यानंतर नांदेडमध्ये सेना बंडखोर बालाजी कल्याणकर ( Rebel MLA Balaji Kalyankar ) यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष ( BJP Workers carnival ) साजरा केला. आमदार कल्याणकर समर्थकानी बँड बाजाच्या तालावर ठेका धरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत आमदार समर्थकांनी जोरदारपणे जल्लोष केला. विशेष म्हणजे यावेळी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ ( In Support of The Rebel Legislators ) शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेना-भाजपचे कार्यकते आज अडीच वर्षांनंतर एकत्र येताना दिसले. भाजप कार्यकर्त्यांनी फुले दाम्पत्याच्या पुतळ्यासमोर एकत्र येत फडवणीस यांच्या नावाचा जयघोष केला. तर इकडे मालेगाव रोडवर बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घरासमोरसुद्धा आनंदोत्सव साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details