Subhash Lande निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत आहे - सुभाष लांडे - Election Commission is working on BJP wish
निवडणूक आयोगाच्या पुढे शिवसेना कोणाची पक्षाचिन्ह आणि पक्षाचे नाव कोणाचे हा संघर्ष एका टप्प्यावर आता येऊन पोहोचला आहे. काल निवडणूकआयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray आणि तसेच शिंदे गटाचे एकनाथ शिंदे Eknath Shinde of Shinde group या दोन्ही गटांना पक्षाचे नाव व पक्षाचे चिन्ह वापरण्यास सक्त मनाई केलेली आहे. ही मनाई तात्पुरता जरी असली तरी निवडणूक आयोगाचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाचा Bharatiya Janata Party इशा-यावर झालेला असल्याचं डाव्या पक्षांमधून प्रतिक्रिया उमटलेली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष Communist Party of India महाराष्ट्राचे नेते सुभाष लांडे Subhash Lande यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना म्हटले आहे, की निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपाच्या इशारावर झालेला दिसतो आहे.