दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन - मुंबई
मुंबई - दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन व्हावी या मागणीसाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा एक गट शिवसेना भवन येथे आंदोलन करणार होता. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारल्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिवाजी पार्क येथे आंदोलन केले आहे. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली. वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला मात्र परीक्षा ऑफलाइन का द्यायची? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी केला. नवीन शंभर ते दीडशे विद्यार्थी यावेळी जमा झाले होते. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...