'झेपत नसेल तर शिकू नको' म्हणणाऱ्या तावडेंना त्या विद्यार्थ्याने असे दिले प्रत्युत्तर - अमरावती विद्यार्थी तावडे उत्तर
अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात जानेवारी महिन्यात माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे अमरावती येथे आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला असता, त्याला अपमानित करणाऱ्या तावडेंचे त्यावेळी चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अटकेचे आदेश देणाऱ्या तावडेंना विद्यार्थ्यांनी आज सडेतोड उत्तर दिले. संत गाडगे बाबा विद्यापीठात उत्तम गुणांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन सुवर्ण पदक मिळवून त्याने तावडेंना एक प्रकारे प्रत्युरच दिले आहे.