Stone Pelting Near Residence of Yasin Malik : टेरर फंडिंग प्रकरणात आरोपी यासीन मलिकच्या घराबाहेर दगडफेक, पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या - Stone Pelting Near Residence of Yasin Malik
श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) - टेरर फंडिंग प्रकरणात ( Yasin Malik Accused In Terror Funding Case ) दोषी ठरलेल्या यासीन मलिकला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात कडक बंदोबस्तात हजर ( Yasin Malik Present In Patiala House Court ) करण्यात आले. पटियाला हाऊस कोर्टाने यासीन मलिकच्या शिक्षेच्या मुदतीवर निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये यासीन मलिकच्या घराजवळील मैसुअम येथे दगडफेक सुरू आहे तर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.