Nagpur Star Bus Caught Fire : नागपूर मनपाच्या स्टारबसला अचानक आग, प्रवाशी सुखरूप - नागपूर मनपाच्या बसला आग
नागपूर - आरबीआय चौकामध्ये नागपूर मनपाच्यास्टार ( Nagpur Star Bus Caught Fire ) बसला अचानक आग लागल्याची घटना सकाळी साडे 9 वाजताच्या सुमारास घडली. मागील काहीं दिवसात विदर्भात तपमान प्रचंड ( Temperature Increase In Vidarbha ) वाढ झाली असताना स्टार बसला आग लागण्याच्या घटना वाढत आहे. इंजिनच्या भागात आग लागल्याचे लक्षात येताच चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. बस थांबवत 35 प्रवाश्याना सुखरूप खाली उतरवले. आगीत चालकांची कॅबिनसह बस जळून खाक झाली. लागलीच अग्निशामक दल पोहचून पाण्याचा मारा करत आग विझवण्यात आली. यावेळी आग लागताच दूरपर्यंत आगीचा धूर निघतांना दिसत होता. वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीच्या घटनेनंतर काही वेळ वाहतूक थांबवण्यात आली. यानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.