VIDEO : ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आला विषारी नाग
ठाणे :- दररोज पोलीस ठाण्यामध्ये हजारो प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी नागरिक येत असतात मात्र काल नौपाडा पोलीस ठाण्यात आलेल्या एकाने पोलिसांना घाबरवले आहे.ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये रात्री बारा वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये विषारी साप आढळून आला. रात्री पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे आपल्या पहिला माळ्यावरील ऑफिस मध्ये गेले असता. टेबलाखाली पाच फुटी नाग आढळून आला या नागाला पाहताच त्वरित प्राणिमित्र पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिरसाट व हवालदार समीर डीके यांना बोलवून अत्यंत शीताफिने या नागाला बाहेर काढून प्रणिमित्र शिरसाठ यांच्या कडे सोपवण्यात आला. नौपाडा पोलीस ठाण्याच्या शेजारीच मोठी झाडें आहेत. या झाडाच्या फांदयांवरून कदाचित नाग पोलीस स्थानकात आला असेल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. परंतु अशा प्रकारे साप पोलीस स्थानकात येत असल्यास जीवावर बेतण्यासारख ठरू शकते त्यामुळे अशा ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचं असल्याच देखील महत्वाचं आहे.