महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 18, 2022, 10:00 PM IST

ETV Bharat / videos

Ink Throw RTO Officer : आंबेडकर जयंती साजरी केली नाही; अधिकाऱ्याला फासले काळे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ( Babasaheb Ambedkar Jayanti ) ही शासकीय स्वरूपात सर्वत्र साजरी करण्याचा आदेश बंधनकारक आहे. असे असताना श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयात ( Shrirampur RTO Office ) बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली नाही. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर आरपीआय आठवले गटाच्या वतीने आज ( 18 एप्रिल ) उपप्रादेशिक कार्यालयाचे गेट बंद करून जाहीर निषेध करत करण्यात आला. तसेच, गांधीगिरी करत उपप्रादेशिक अधिकारी नानासाहेब बच्छाव यांना पुष्पहार घालून सत्कार केला. त्यानंतर बच्छाव यांना कार्यकर्त्यांनी काळे फासले ( Ink Throw RTO Officer ) आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details