शिवसेनेकडून इंधन दरवाढीचा निषेध, केले मोफत पेट्रोलचे वाटप - मुंबई न्यूज अपडेट
देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे, पेट्रोलने शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली असून, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. एवढेच नव्हेतर इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून, बोरिवलीमध्ये शिवसेना व माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या वतीने प्रत्येकी एक लिटर पेट्रोलचे वाटप करण्यात आले.