Shivsena Activists Smashed Kirit Somaiya Car : शिवसैनिकांनी फोडले किरीट सोमैया यांचे वाहन, सोमैया किरकोळ जखमी - खार पोलीस
मुंबई - किरीट सोमैया यांच्या वाहनांवर शिवसैनिकांनी हल्ला केला असून त्यांच्या वाहनाची काच फोडण्यात आली ( Shivsena Activists Smashed Kirit Somaiya Car ) आहे. यामध्ये किरीट सोमैया किरकोळ जखमी झाले आहेत. सोमैया राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. राणा दाम्पत्यांना भेटल्यानंतर ते परतत असताना वाटेतच काही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला. पोलिसांनी परिस्थीती नियंत्रणात आणली आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी किरीट सोमैया हे वांद्रे पोलीस ठाण्याकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.