Shivsainik Attack Mohit Kamboj Car : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला - Shivsainik Attack Mohit Kamboj Car latest news
मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण ( Ran Couple Hanuman Chalisa Recite ) करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला ( Shivsainik Attack Mohit Kamboj Car ) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. मोहित कंबोज इथे आलाच कसा, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे. तसेच, मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आले होते का?, अशी चर्चाही मातोश्रीबाहेर सुरु आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी घेराव घातल्यानंतर मोहित कंबोजनी काढता पाय घेतला आहे.
Last Updated : Apr 23, 2022, 6:49 AM IST