Shiv Sena Rebel MLA Santosh Bangar : मीच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि राहणार - संतोष बांगर
हिंगोली - कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर ( Shiv Sena Rebel MLA Santosh Bangar ) हे एकनाथ शिंदे गटांमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. परंतु, हे मला अजिबात मान्यच नसून मी एका शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केले आहे. त्यामुळे मी शिवसेना जिल्हाप्रमुख आहे आणि असणार असे हकालपट्टी झाल्यानंतर गोधळून गेलेले आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी शिवसेनेचा कडवा सैनिक असून माझ्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. ती जबाबदारी आजही मी पेलत असून माझे शिवसेना जिल्हाप्रमुख पद काढून घ्यावे, अशी कोणती चूक केलेली नाही. मी एका शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केलेले आहे. यामध्ये अजिबात गैर नाही त्यामुळे मीच शिवसेना जिल्हाप्रमुख राहणार असून मला या पदावरून काढून टाकले आहे. हे अजिबात मान्य नसल्याचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आल्याच्या ज्या काही बातम्या चालल्या जात आहेत. त्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे स्पष्ट वक्तव्य संतोष बांगर यांनी केले आहे. ( Santosh Bangar on Hingoli District President )