महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bhaskar Jadhav VS Devendra Fadnavis : जाधव VS फडणवीस; 'पंतप्रधानांच्या इच्छेनुसार, बाळासाहेबांच्या सच्च्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदी बसवले' - Shiv sena MLA Bhaskar Jadhav

By

Published : Jul 4, 2022, 6:56 PM IST

मुंबई - गेल्या ८ दिवसांत मी खूप अस्वस्थ, विचलित झालोय. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे आजही सभागृहात सांगतात मी शिवसेनेचा आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा वारसदार आहे. तुमच्यावर आता खूप जबाबदारी आलीय. तुमची आणि माझी फारशी उठबस झाली नाही. तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हता. एकनाथ शिंदे गटनेते झाले. सत्कार करण्यासाठी एकदा आलो. माझी आणि तुमची भेट २ वेळाच झाली आहे. तसेच ज्यांच्या मागे ईडी लावली त्यांनाच केंद्राने सुरक्षा दिली, असा घणाघात भास्कर जाधव यांनी ( Shiv sena MLA Bhaskar Jadhav ) दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण ( Deputy CM Devendra Fadnavis ) केले. यावेळी त्यांनी आपण विरोधी पक्षनेते म्हणून योग्य पद्धतीने केले. आम्ही नेहमीच सांगितले की, जेव्हा हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ. आणि आम्हीच बाळासाहेबांच्या सच्च्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदावर बसवू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. आणि आम्ही ते करुन दाखवले. असे ते म्हणाले. ( Assembly Session 2022 ) ( Bhaskar Jadhav VS Devendra Fadnavis )

ABOUT THE AUTHOR

...view details