Sanjay Raut : हे भाजपाचे षडयंत्र, कोणी कितीही म्हटले तरी संघटनेला तडा गेलेला नाही - संजय राऊत - संजय राऊत एकनाथ शिंदे प्रतिक्रिया
मुंबई - राज्यात राजकीय भुकंपाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यावर संजय राऊत ( Sunjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे भारतीय जनता पक्षाचा षडयंत्र आहे, ऑपरेशन लोटससाठी हा प्रकार यांनी सुरू केला आहे. आमच्या आमदारांचे अपहरण करून गुजरात पोलिसांनी त्यांचे पोलिसांच्या गराडा त्याला ठेवण्यात आले. यातून सुटका करून घेणाऱ्या आमदारांवर हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यातून शिवसेना बाहेर पडेल. कोणी कितीही म्हटले तरी संघटनेला तडा गेलेला नाही. संध्याकाळी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत गेली अनेक वर्षे आम्ही सोबत काम करतो. त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. त्यामुळे मुंबईला येऊन त्यांनी आमच्या सोबत चर्चा करण्याचा आम्ही आवाहन केले आहे. तिथे जाऊन चर्चा करणे हे शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. ( MP Sanjay Raut about Eknath shinde )