VIDEO : नागपुरात कामगार कायद्या विरोधात कामगार सेनेचे आंदोलन - कामगार सेना आंदोलन नागपूर
नागपूर - औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा व वेतन विषयक नव्याने पारित झालेल्या कायद्याच्या विरोधात शिवसेनेच्या कामगार सेनेकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र कामगार दिन कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात संविधान चौकात निदर्शने करण्यात आले. यावेळी केंद्र सरकाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. या कायद्याने कामगार चळवळीने शंभर वर्षात मिळविलेल्या हक्कांवर गदा येणार असल्याचे म्हणत हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी हातात फलक घेऊनही कायद्यांच्या विरोध दर्शविण्यात आला. केंद्र सरकारने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.