Shivsena शिंदे गटाला कुत्रा हा चिन्ह द्यावे, चिन्ह गोठवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक
पुणे निवडणूक आयोगाने Election Commission शिवसेना आणि शिंदे गटातील Shiv Sena and Shinde group पक्ष चिन्हा बाबत निर्णय दिला आहे. आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. दोन्ही गटांना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून याला शिंदे गट आणि भाजप जबाबदार असल्याच सांगितल जात आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे घोषित केलं आहे. अजूनही शिंदे गटाकडून नाव तसेच चिन्ह बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आयोगाने चिन्ह गोठवल्या नंतर शिवसैनिक हे आक्रमक झाले असून आत्ता जे चिन्ह मिळेल ते राज्यातील जनतेच्या मनामनात पोहचवू अस शिवसैनिक सांगत आहे. तर आत्ता आयोगाने शिंदे गटाला कुत्रा हा चिन्ह द्यावा अशी टीका देखील शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे.