Maharashtra Weather Forecast : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस मुसळधार; रेड अलर्ट जारी - Maharashtra Weather Forecast
पुणे: जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्या नंतर मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर उद्या कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.