Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार कोसळणार? पाहा तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया... - Chhagan Bhujabal
मुंबई - महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी आपली भूमिका शिवसेना पक्षप्रमुखासमोर आपले म्हणणे मांडावे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा, असे संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे. तर यानंतर आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही आपली भूमिका मांडली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) हे माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांच्यासाठी सर्व मार्ग खुले आहेत. तर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujabal ) यांनी सांगितले की, त्यांनी शरद पवारांशी चर्चा करावी. त्यांना आघाडी सरकारमधून बाहेर पडायचे असेल तर आम्ही विरोधात बसायला तयार आहोत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून लढाई करुच, असे स्षष्ट उत्तर त्यांनी दिले. ( Nana Patole on maharashtra political crisis ) कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण मिळत आहे. तर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.