Video : असा आहे विदर्भ, मराठवाड्यात समृद्धी आणणारा समृद्धी महामार्ग.. तशी २१० किमी वेगाने प्रवास - Travel at speed of 210 km per hour
नागपूर : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची ( Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg ) ओळख बनते आहे. येत्या २ मे पासून हा मार्ग सर्वांकरिता खुला केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण केले जाणार ( CM Will Inaugurate Samruddhi Mahamarg ) आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महामार्गाचा आढावा घेतला. समृद्धी महामार्गामुळे आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. तसेच २१० किलोमीटरचा प्रवास वेगाने होणार ( Travel at speed of 210 km per hour ) आहे. महामार्गाच्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. वन्य जीव प्राण्यांसाठी जमिनीखालून आणि महामार्गावरून उड्डाण पूल उभारण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि जलदगतीने प्रवासाकरिता महामार्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी टोल नाके उभारण्यात आले आहेत. जेवढा प्रवास तेवढा कर भरावा लागणार आहे. या महामार्गामुळे देशाच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. सध्या पहिला टप्पा पूर्ण झाला असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे.