महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : हसन मुश्रीफ वयाच्या आठव्या वर्षी पाचवीत? पाहा नेमकं प्रकरण - समरजित घाटगे हसन मुश्रीफ शाळा सोडल्याचा दाखला

By

Published : Apr 18, 2022, 7:03 PM IST

कोल्हापूर - हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या रामनवमीच्या जन्मावरून कागल तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे (Samarjit Ghatage) यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा शाळेचा सोडल्याचा एक दाखला समोर आणला आहे. यामध्ये मुश्रीफ वयाच्या 8 व्या वर्षीच पाचवीत शिकत होते असे घाटगे यांनी म्हटले आहे. मुश्रीफ यांनी आपला जन्म रामनवमीला झाला असून, त्यानुसार आपण त्यादिवशी वाढदिवस साजरा करतो. त्यामुळे घाटगे यांच्या पोटात का दुखते? असा सवाल केला आहे. यावर घाटगे यांनी ही जनतेची साफ फसवणूक केली असल्याचा आरोप केला असून, मुश्रीफ स्वतःच चक्रव्यूहात अडकत चालले आहेत असे म्हटले आहे. त्यातच त्यांनी हा दाखला समोर आणला असल्याने धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यावर आता मुश्रीफ काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details