Sadabhau Khot : तुमचा पराभव झाला म्हणून घोडेबाजार, हे महाविकास आघाडीला शोभत नाही- सदाभाऊ खोत - महाविकास आघाडीच्या नेत्यांना सदाभाऊ खोतांनी फटकारले
मुंबई - राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाल्याने भाजपमध्ये फार उत्साह दिसून येत ( Rajya Sabha Election Result 2022 ) आहे. परंतु भाजपच्या विजयावर शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी प्रश्न उपस्थित करत हा घोडेबाजार होता असे म्हटले आहे. त्यावर बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांना चांगलेच फटकारले ( Sadabhau Khot Criticized MVA Leaders ) आहे. 'खालेल्या मिठाशी तुम्ही एकनिष्ठ राहिला नाहीत, वर आम्हाला सांगता', असे सांगत देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांची प्रशंसा त्यांनी केली आहे. त्याच बरोबर २० जूनला विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या पाठिंब्यावर सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याबाबतही देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील असेही ते म्हणाले.