महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pankaja Munde Supporter Drunk Roger : पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न - पंकजा मुंडे समर्थक आत्महत्या प्रयत्न

By

Published : Jun 9, 2022, 5:30 PM IST

अहमदनगर - विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना सातत्याने राजकारणात स्वतःच्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details