Pratap Sarnaik : 'विघ्नहर्ता आमच्या पाठीशी असल्याने सर्व विघ्ने दूर झाली' : आमदार प्रताप सरनाईक - एकनाथ शिंदे
ठाणे : भाजपाशी जुळवून घ्या, हे पत्र मी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना देवून एक वर्ष झाले. आमच्या नेत्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. परंतु ते एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना कळलं. हे सरकार एक वर्षांपूर्वी झाले असते तर राज्यात खूप विकासकामे झाली असती, असं प्रतिपादन शिंदे गटाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik ) यांनी केलं. ते म्हणाले की, मी आश्वासनाकरता काम करत नाही. काही अपेक्षा ठेवून त्यांच्यासोबत मी गेलो नाही. विघ्नहर्ता सरनाईक परिवाराच्या पाठीशी उभा आहे म्हणून आमच्यावरील सर्व संकटे दूर झाली. जे आम्हाला गद्दार बोलतात त्यांनी गद्दाराची व्याख्या समजली पाहिजे. आम्ही गद्दार नाही तर खुद्दार आहोत, असंही सरनाईक ( Pratap Sarnaik Criticized Shiv Sena ) म्हणाले.